चोरी, घरफोडी करणारे जेरबंद…

dombivali – चोरी, घरफोडी करणा-या चार जणांना मानपाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. जुनेद खान, साजिद खान, फजल उर्फ फैजल आयुब कुरेशी आणि अकलीम डोलारे अशी यांची नावे आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्यातील एका दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या चौघांना मुंब्रा, कल्याण परिसरातून अटक केली आणि त्यांच्याकडून मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील आणि इतर २ गुन्हयातील २,१०,०००/- रू. किंमतीचे डिझेल, रोख रक्कम, ४ प्लास्टीकचे ड्रम, तसेच गुन्हयात वापरलेली एक कार असा मुददेमाल हस्तगत केला.
फजल उर्फ फैजल आयुब कुरेशी याच्याकडून मानपाडा पोलीस ठाण्यातील २ आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यातील १ असे ३ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची यशस्वी कामगिरी अतूल झेंडे, पो. उप आयुक्त, परी ३, कल्याण, सुहास हेमाडे सपोआ/डोंबिवली विभाग, वपोनिरी/ विजय कादबाने, पोनि / रामचंद्र चोपडे (गुन्हे), पोनि/ दत्तात्रय गुंड (प्रशासन), पो.निरी गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/महेश राळेभात, सपोनिरी/संपत फडोळ, सपोनिरी/ सागर चव्हाण, पोहवा/सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, शिरीष पाटील, सुजु मासाळ, विकास माळी, सुनिल पवार पोना / गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यलप्पा पाटील, पोकों/गणेश बडे, नाना चव्हाण, घनश्याम ठाकूर, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके यांनी केली आहे.