घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड…
THANE – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मालमत्ता गुन्हे कक्ष पोलिसांनी अटक केली आहे. मोहंमद सादीक रिझवान शेख आणि अहमद रझा अबुबकर सिद्दीकी अशी या दोघांची नावे आहेत.
कळवा पोलीस ठाणे हद्दीतील देवकीनंदन बस स्टॉप जवळ, खारेगांव, कळवा याठिकाणी झालेल्या घरफोडी चोरीबाबत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे कक्ष गुन्हे शाखेकडून चालू होता. त्याआधारे मालमत्ता गुन्हे कक्ष पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून या दोघांना अटक केली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी घरफोडी चोरीची कबुली दिली आणि गुन्हयातील चोरलेला मुददेमाल हा बनेली येथे बंटी उर्फ नितीन कदम यास विकला असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ही कोनगाव परीसरातून चोरी केली असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी पोलिसांनी या दोघांना पुढील तपासकामी कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हि यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, गुन्हे ठाणे, सहा. पोलीस आयुक्त राजकुमार डोगरे, शोध-२, गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनि आनंद रावराणे, सपोउनि अर्जुन करळे, पोहवा दिनेश कुंभारे, पोहवा प्रशांत भुर्के, पोहवा किशोर भामरे, पोअं राजकुमार राठोड, पोअं. नवनाथ कोरडे, पोअं. पाटील, पोअं. सदन मुळे यांनी केली आहे.