महाराष्ट्र
अंबरनाथ : प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात साचले पाणी…
Ambarnath – प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले आहे. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर आल्यामुळे गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचले असून, गाभारा भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे.
दरवर्षी नदीला पाणी वाढल्यानंतर अशाप्रकारे गाभाऱ्यात पाणी शिरुन भोलेनाथाला जलाभिषेक घातला जातो.
गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत. दरम्यान, पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.