गावठी कट्ट्यासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी केली अटक…
कल्याण – गावठी कट्ट्यासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. केतन बोराडे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून २५,६००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, १ मॅग्जीन, ३ जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला.
लोकसभा निवडणुकीच्या मोक्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना गुप्त बातमी मिळाली की राम मारुती चौक कल्याण येथे संशयितरित्या गावठी कट्ट्यासारखे अग्नीशस्त्र घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक इसम फिरत आहे. त्याअनुषंगाने पोलीस हवालदार सचिन साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून केतन बोराडे यास अटक केली आणि त्याच्याकडून २५,६००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, १ मॅग्जीन, ३ जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी कल्याण झोन ३ डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक ( प्रशासन) साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी रूपवते, पो.उप.निरी मोरे, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल, परमेश्वर बाविस्कर, अरुण आंधळे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास API नवनाथ रुपवते करीत आहेत.