महाराष्ट्र
एसटीचा भीषण अपघात…

नाशिक – नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळील चांदवड येथील राहुड घाटात सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या महतीनुसार, जळगाव ते वसई जाणारी बस व ट्रक यांच्यात हा अपघात घडला. एसटी बस जळगाव येथून नाशिकला जात असताना ओवरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.