मुंबई

टॉर्च लावून महिलेची प्रसूती; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील प्रकार…

मुंबई – भांडुपमधील सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये टॉर्च लावून महिलेची प्रसुती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अचानक लाईट गेल्याने डॉक्टरांनी चक्क टॉर्च लावून महिलेची प्रसुती केली. या घटनेत महिलेचा व नवजात शिशुचा मृत्यू झाला आहे, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पालिका प्रसूतीगृहामध्ये प्रसुतीसाठी एका महिलेला दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसुती करत असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली. त्यावेळी सिझर करत असताना नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर जास्त रस्तस्राव होऊ लागल्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तिला देखील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे उपचार सुरू असताना या महिलेचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी संपात व्यक्त करत रुग्णालयामध्ये एकच गोंधळ घातला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page