रिक्षा चालकाला मारहाण करणाऱ्यास कल्याण गुन्हे शाखेने केली अटक…
डोंबिवली – रिक्षा चालकाला मारहाण करणाऱ्यास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. हर्ष उर्फ रोहित तिवारी असे याचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेतील श्री स्वामी समर्थ रिक्षा स्टॅन्ड समोर सचिन मस्कर हा रिक्षा चालक रिक्षा घेऊन प्रवासी भाड्याची वाट पाहत असताना रोहित तिवारी याने सचिनला उधारीचे पैसे मागितले त्यावेळी सचिनने पैसे नंतर देतो म्हणून सांगितले याचा राग मनात धरून रोहितने सचिनला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याची रिक्षा जबरदस्तीने घेऊन गेला असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नमस्कार ढाबा अडिवली – ढोकाळी डोंबिवली (पूर्व) येथून रोहित तिवारीला अटक केली.
सदारची यशस्वी कामगिरी वपोनिरी नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन वानखेडे, पोलीस हवालदार कामत आणि पोलीस शिपाई उमेश जाधव, पोलीस हवालदार बालाजी शिंदे यांनी केली आहे.