महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या गाडीचा अपघात…
सातारा – केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. साताऱ्यातील वाई परिसरात ही घटना घडली. त्यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिली. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. तसेच कोणीही जखमी झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली.