डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय…
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलाच्या एका सदनिकेत संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा नावाने हे मसाज पार्लर चालू होते.
याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लर चालवणारी महिला जयश्री मुंढे हिच्या विरुध्द टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोन पीडित महिलांची सुटका केली.
याबाबत वृत्त असे आहे कि, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकणी छापा टाकला असता, त्याठिकाणी ३५ ते ३८ वयातील २ पीडित महिला मिळून आल्या.
सदर प्रकरणी पोलिसांनी त्याठिकाणहून ७ हजार रुपये आणि इतर साधने जप्त केली. तसेच मसाज पार्लर चालवणारी महिला जयश्री मुंढे हिच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.