ठाणे

कल्याण मधील काळा तलाव परिसरात गोळीबार…

कल्याण – काळा तलाव परिसरात गोळीबार करून त्यानंतर या परिसरातील गाड्यांची तोडफोड करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. परिसरात दहशत माजवण्यासाठी २ तरुणांनी पिस्तुलने गोळीबार केल्याची माहिती समोर आली असून सदर प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम येथील काळा तलाव परिसरात हे दोघे चंदन भदोरिया नावाच्या व्यक्तीच्या शोधात आले होते.त्यावेळी त्यांनी एका तरुणाला चंदनचा पत्ता विचारला मात्र तरुणाने माहित नसल्याचे सांगितले. त्यावेळी या दोघांनी या तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरातील गाड्यांचीही तोडफोडही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page