टेम्पो चोरी करणाऱ्या तिघांना…

नवी मुंबई – नवी मुंबई, ठाणे तसेच इतर जिल्हयातून तीन चाकी टेम्पो चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. अन्वर रसुलखान पठाण, मन्नन अब्दुल शेख आणि फिरोज मुक्करम शेख, उर्फ मुल्ला अशी या तिघांची नावे आहेत.
मागील काही दिवसांपासून अॅपे टेम्पो चोरीच्या गुन्हयात वाढ झाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकास अटक केली त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी दोघांना जालना आणि बीड जिल्ह्यातून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १० अॅपे टेम्पो, १ मोटर सायकल, १ टेम्पोचे इंजिन व चोरीचे टेम्पो स्क्रॅप करून विक्री केलेली रक्कम असे एकूण ८,४४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नवी मुंबई, ठाणे, अहमदनगर, परभणी, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयातील एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले.