ठाणे

चोरीच्या उद्देशाने पोलिसाने केली फायरिंग…

ठाणे – चोरीच्या उद्देशाने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. सुरज ढोकरे असे याचे नाव असून अहमदनगर पोलिसांनी सूरजला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त आहे कि, पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेंदे गावाजवळ रोडवर दोन इसमांवर फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न कऱण्यात आला होता. याबाबत पडघा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.५३३ / २०२३ भा.द.वि.सं. कलम ३०७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून अहमदनगर पोलिसांच्या मदतीने एकाला अटक केली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुरज ढोकरे असे सांगून तो मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असल्याचे सांगितले तसेच त्याच्यावर वेगवेगळया बँकाचे व पतपेढीचे जवळपास ४० ते ४२ लाखाचे कर्ज आहे. सदर कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याने चोरीच्या उद्देशाने सदर प्रकार केला असल्याचे सांगितले.

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक विकम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली धाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  उप विभागीय पोलीस अधिकारी गणेशपुरी, प्रशांत ढोले, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहापुर मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक पडघा संजय साबळे, पोलीस निरीक्षक स्था. गुं. शाखा, ठाणे ग्रामीण सुरेश मनोरे, सहा. पोलीस निरीक्षक नितीन मुदगन पडघा पोलीस ठाणे पोलीस उप निरीक्षक महेश कदम स्था. शाखा, सागर जाधव कसारा पोलीस ठाणे तसेच पडघा, कसारा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page