देश
राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा!…

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावाच्या मानहानी प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.