डोंबिवली

डोंबिवलीत १८२ कसूरदार वाहन चालकांवर कारवाई…

डोंबिवली – १८२ कसूरदार वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली.

डोंबिवली वाहतूक उपविभाग अंतर्गत म्हसोबा चौक,९० फिट रोड, डोंबिवली पूर्व याठिकाणी डॉ.श्री विनयकुमार राठोड,पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या आदेशाने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली असून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये विदाऊट हेल्मेट  ४९, विदाऊट सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ६, ब्लॅक फिल्म १,  ट्रिपल सीट ४,  फ्रंट सीट ३, गणवेश न घालणे ३ व इतर ९४ अशा एकूण १८२ कसूरदार वाहन चालकांवर कारवाई करून एकूण १,३,१५०/- रु. दंड आकारण्यात आला असून त्यापैकी ७२,९००/- रु. दंड जागीच वसूल करण्यात आला असल्याचे डोंबिवली वाहतूक उप विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

या कारवाई मध्ये डोंबिवली वाहतूक विभागाचे १ अधिकारी, ९ पोलीस अंमलदार व ८ वॉर्डन तसेच कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे २ अंमलदार,१ वॉर्डन व कल्याण वाहतूक उप विभागाचे २ पोलीस अंमलदार असे एकूण १ अधिकारी, १३ अमलदार, ९ वॉर्डन हजर होते.

यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सीसीटिव्ही कॅमेरा द्वारे वाहतूक विभागाकडून ई चलन कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page