महाराष्ट्र

दाढीवाले बाबांचा कार्यक्रम ठरलेला आहे – नाना पटोले…

कल्याण – जाहिरातींवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

पहिली जाहिरात छापण्यात आली त्या जाहिरातीमध्ये दाढीवाले बाबा पुढे होते. त्यानंतर भाजप मंडळाची चलबिचल झाली आणि आठ दिवसामध्ये दुसरा सुरू सर्व्हे आला. त्यामध्ये तर आमचे नागपूरचे पुन्हा येईनवाले आले. मग दाढीवाल्यांचे ५० जे होते, त्या ५० मध्ये १५  निवडून येतील असे त्यांच्या सर्व्हेमध्ये दाखवण्यात आले. म्हणजे दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम ठरलेला असल्याचे या जाहिरातीवरून स्पष्ट होते, असा टोला नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंना नाव न घेता लगावला. काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त कल्याणमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते.

त्यानंतर  हा कोणाचा लोभ आहे, तेच लोक लोभाचे उदाहरण देत आहेत. बघा काय परिस्थिती असेल, पदाची लालसा किती असेल, राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी हे सरकार नाही. मी मुख्यमंत्री होऊ शकतो, यावर राजकारण करण्याची मानसिकता या लोकांची आहे, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन लोटस दुसऱ्याचे घर बरबाद करत आहेत. महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी नाही. लोकशाहीच्या विरोधातील हे भाजपचे काम आहे. परंतु महाराष्ट्राची जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असेही पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page