पोलीस हवालदारावर लाच मागणी प्रकरणी कारवाई…

पुणे – लाच मागणी प्रकरणी एका पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी गुन्हा दाखल केला आहे. २०,०००/- रु. लाच मागितल्याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोहवा रामदास जाधव यांनी २५,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या बरोबर चर्चा करुन पोहवा रामदास जाधव यांनी प्रथम २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.