ठाणे

महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरी…

४७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

कल्याण – घरफोडी करणाऱ्यास महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणून ६,२४,३५५/- रू.ची मालमत्ता हस्तगत केली.

जावेद अख्तर मोहमद सलीम शाह असे याचे नाव आहे. फिर्यादी महिला यांच्या घरातील एकूण ५,७९,५०५/- रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, LED टि.व्ही., रोख रक्कम व इतर मालमत्ता अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले असल्याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी येथून जावेद अख्तर मोहमद सलीम शाह यास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने रामबाग कल्याण प. येथे २ घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. सदर प्रकरणी ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हयातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, LED टि.व्ही., रोख रक्कम असे एकूण ६,२४,३५५/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

तसेच ४५,०४,०००/- रू रोख रक्कम अपहार करून पळून गेलेल्या नोकराच्या साथीदारास महात्मा फुले चौक पोलिसांनी राजस्थान येथून अटक करून ४९.१५,०००/- रू. रोख रक्कम हस्तगत केली.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी इसम यांच्या भावाच्या मुलाने त्यांच्याकडे काम करीत असलेला रमेश देवासी यास ४५,०४,०००/- रु रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली असता त्याने सदर रोख रक्कम बँकेत न भरता रक्कमेचा अपहार करून पळून गेला असल्याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता सदर गुन्ह्यात रमेश देवासी यास त्याचा साथीदार जगदीश देवासी याने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे जगदीश देवासी यास राजस्थान येथून अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील अपहार केलेले ४९.१५,०००/- रु. रोख रक्कम हस्तगत केली.

अशा प्रकारे महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करून एकूण ४७,३९,३५५/-रु. मुद्देमाल हस्तगत केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page