महाराष्ट्र
भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली…

भिवंडी – भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली असल्याची घटना घडली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर एकला वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील खाडीपार भागात ही घटना घडली, मुलचंद कंपाऊंडमध्ये असलेली एक जुनी जी प्लस टू इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली. ३० ते ३५ वर्षाची ही जुनी इमारत होती. इमारत कोसळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे.