महाराष्ट्र

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी…

पुणे – कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. आता 27 फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निकाल मात्र 2 मार्चलाच लागणार आहे. बारावीच्या परीक्षा असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. परंतु या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page