३० हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात…

वाशिम – ३० हजारांची लाच घेताना एका तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांनी रंगेहात पकडले. आशिष प्रदीप सावंगेकर असे या तलाठ्याचे नाव आहे. ते साजा वडगांव, तहसील कार्यालय मानोरा जि.वाशिम येथे कार्यरत आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांचे आजीचे नावे असलेली ५ एकर शेती बक्षिस पत्राव्दारे आजीचा पनतु यांचे नावे करण्यासाठी बक्षिस पत्र करून त्याची फेरफारला नोंद करण्याकरिता यातील तलाठी सावंगेकर यांनी ५०,०००/- रू. लाचेची मागणी करून तडजोडअंती ४१,०००/- रु. स्विकारण्यास सहमती देऊन पहिले ३०,०००/- देण्याचे सांगून फेरफार नोंद घेतल्यानंतर ११,०००/- रु. देण्याचे सांगितले.
सापळा कार्यवाही दरम्यान, ३०,०००/- रु. लाच रक्कम तलाठी आशिष सावंगेकर यांनी बळीराम नगर आमकिन्ही येथे स्विकारली असता सावंगेकर यांना एसीबीने ताब्यात घेतले.