महाराष्ट्र
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा मृत्यू…

महाराष्ट्र – अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष आणि निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शेळकेंचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिली. आणि कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली.
ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून, जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे.



