महाराष्ट्र
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला!…

pune – मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. माहितीनुसार, यात २० ते २५ जण वाहून गेले आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल कोसळला आहे. दरम्यान, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.