महाराष्ट्र
बीडमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू…

beed – बीडमध्ये गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पवन चक्कीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे. नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील पवनचक्की कंपनीच्या परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लिंबा गणेश परिसरात पवनचक्की उभारणीचं काम सुरू आहे. याच ठिकाणी साहित्य ठेवण्याचा यार्ड आहे. मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरीचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवण्यासाठी गोळीबार केला. यात एकाला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला आहे.