मुंबई

आरबीआयकडून रेपो दरात कपात…

mumbai – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली असून, रेपो दरात 0.25 टक्क्यांच्या दर कपातीनंतर दर 6.25 वरुन 6 टक्के झाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे.

या वर्षीची ही दुसरी कपात आहे. फेब्रुवारीमध्ये आरबीआयने जवळजवळ पाच वर्षांत प्रथमच रेपो दर 6.5 टक्क्यावरून 6.25 टक्क्यापर्यंत कमी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page