युवा सुत्र ‘दीपोत्सव विशेषांक २०२३’ प्रकाशित…

डोंबिवली – साप्ताहिक युवा सुत्रचा पहिला ‘दीपोत्सव विशेषांक २०२३’ चा प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे उत्सहात पार पडला.
सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनील कुराडे यांच्या हस्ते ‘युवा सुत्र दीपोत्सव विशेषांक २०२३’ प्रकाशित करण्यात आला. सोहळ्याला राम नगर पोलीस ठाण्याचे वपोनिरी नितीन गीते, टिळक नगर पोलीस ठाण्याचे वपोनिरी उमेश गीते, राम नगर पोलीस ठाण्याचे API गणेश जाधव, बळवंत भराडे, टिळक नगर पोलीस ठाण्याचे PSI शेख आणि इतर पोलीस कर्मचारी तसेच युवा सुत्र चे संपादक युवराज सुर्ले, महाराष्ट्र न्यूज संपादिका अमृता पाटणकर, महाराष्ट्र न्यूज सल्लागार डॉ. सुनील खर्डीकर, भगवान मोरजकर उपस्थित होते.
यावेळी सुनील कुराडे यांनी संपूर्ण युवा सुत्र टीमचे अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रकाशित दीपोत्सव विशेषांक अतिशय वाचनीय असा झाला आहे. या अंकात लेख, कथा, कविता, प्रवास वर्णन या सर्वांचा समावेश केल्याने वाचकांची दिवाळी हर्ष भरीत होणार आहे. हा अंक सर्वाना आवडेल असा विश्वास यावेळी युवा सुत्रच्या संपादकांनी व्यक्त केला.