महाराष्ट्र
कात्रीने वार करून पतीने केली पत्नीची हत्या…
pune – घरगुती वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी परिसरात घडली आहे.
धक्कादायक म्हणजे हि हत्या त्याने आपल्या ५ वर्षाच्या मुलासमोर केली त्यानंतर त्याने याचा व्हिडिओ काढला आणि तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास गिते असे या पतीचे नाव आहे तर ज्योती गिते असे पत्नीचे नाव आहे. शिवदास गिते मूळचा बीड मधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. या दोघांमध्ये काही घरगुती वाद होते आणि या वादातूनच शिवदासने ज्योतीची हत्या केली.