प्रवाशाला लुटणारे गजाआड…
भिवंडी – प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना कोनगाव पोलीसांनी नाशिकमधून अटक करून त्यांच्याकडून ५२,०००/- मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, बासुरी हॉटेल, राजनीली बायपास, भिवंडी येथे तिघांनी फिर्यादीला प्रवाशी म्हणून टेम्पोत बसवले आणि त्याला धाक दाखवून त्याच्याकडील पैसे व मोबाईल व सिकंजा मशीन जबरदस्तीने काढून चोरी केले आणि फिर्यादीला कसारा घाटात सोडून पळून गेले असल्याबाबत कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या तिघांना नांदगाव नाशिक येथून अटक करून त्यांच्याकडून मोबाईल, सिकंजा मशीन आणि रोख रक्कम असा एकूण ५२,०००/- मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगीरी अपर पोलीस आयुक्त सो.प.प्रा.वि. मा. विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ -२, भिवंडी डॉ. मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त पुर्व विभाग सचिन सागळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी सपोनि वैभव चुंबळे, पो. हवा गोरले, पोहवा घोडसरे, पोना पाटील, पोशि वाकसे, पोशि गायकवाड, पोशि साळुंखे, पोशि खडसरे, पोशि पाटील, पोशि विजय ताठे यांनी केली आहे.