महाराष्ट्र

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई…

KOLHAPUR – मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु घटना घडल्यापासून, हे दोघेही फरार आहेत. त्यातील एकाला म्हणजे डॉ.चेतन पाटील याला पोलिसांनी रात्री उशिरा कोल्हापुरातून अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page