प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर…

ठाणे – प्रेयसीचा खून करून परराज्यात पळून गेलेल्या प्रियकराला कोनगाव पोलिसांनी अटक केली. शाब्बीर शेख असे याचे नाव आहे.
कोनगाव येथील गणेश नगर परिसरातील राजपूत निवास मधील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलीस त्याठिकाणी गेले असता त्याठिकाणी एका महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

तपासादरम्यान शाब्बीर शेखचे नाव समोर आले, त्याप्रमाणे पोलिसांनी आणखी तपास करत शाब्बीर शेखचा शोध घेऊन त्याला पश्चिम बंगाल राज्यातून अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, विनोद कडलग, पोलीस उपनिरीक्षक उबाळे, अस्लेशा घाटगे, निलेश वाडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निता पाटील, पोलीस हवालदार उदमले, अरविंद गोरले, जगदिश पाटील, सुनिल पाटील, घोडसरे, पोलीस नाईक नरेंद्र पाटील, पोलीस शिपाई दिगंबर तुपकर, राहुल वाकसे, हेमराज पाटील, कुशल जाधव, खडसरे, गायकवाड, साळुंखे यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील करत आहेत.