खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, १८ लाख ९० हजारांचा चरस जप्त…

ठाणे – खंडणी विरोधी पथकाने एकूण १८ लाख ९० हजारांचा ‘चरस’ हा अंमली पदार्थ जप्त करून तिघांना अटक केली आहे.
भिवंडीतील टेमघर पाईपलाईन रोड लगत एक इसम चरस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून अनिलकुमार प्रजापती याला अटक केली. आणि त्याच्याकडून १७,२०,०००/- रू किमंतीचा १ किलो ७२० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला.
त्यानंतर पोलिसांनी अनिलकुमारला चरस विकणारा अर्जुनकुमार प्रजापती याला प्रयागराज, उत्तरप्रदेश येथून अटक केली. तसेच श्यामबाबु सरोज यास नेरूळ, नवी मुंबई येथून अटक केली आणि त्याच्याकडून १,७०,०००/- रू किमंतीचा १७० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला.
सदर प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण १८,९०,०००/- रूपये किंमतीचा १ किलो ८९० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला आहे.
सदरची यशस्वी कारवाई आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२. गुन्हे शाखा, ठाण, शेखर वागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मघोनि/वनिता पाटील, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि भुषण कापडनिस, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउपनि/कल्याण डोकणे, पोहया/आशिष ठाकुर, पोहवा/संजय राठोड, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/गणेश गुरसाळी, पोहवा/संदीप भोसले, पोहवा / योगीराज कानडे, मपोहवा/शितल पावसकर, चापोना/भगवान हिवरे, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, मपोशि/मयुरी भोसले, पोहवा/निलेश जाधव, पोशि/ढाकणे, चामपोशि/शार्दुल यांनी केली आहे.