डोंबिवली

डोंबिवलीत अपूर्ण रस्त्यामुळे अपघाताचा धोका…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड वरील रिजन्सी चौकी पासून ते मानपाडा पेट्रोल पंप पर्यंत रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. अर्धा रस्ता सिमेंटचा तर अर्धा रस्ता कच्चा आहे. त्यामुळे त्याठिकाणी वाहतूक संथ गतीने होत आहे. शिवाय रसत्यावर कट आहेत यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. 

अपघाताचा व्हिडीओ

तेथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आजच याठिकाणी एक महिला गाडीवरून जात असताना पडल्याची घटना घडली, यात ती थोडक्यात बचावली आहे. अर्धवट रस्त्यांमुळे त्याठिकाणी अपघात होऊन लोकांचे जीव जाऊ शकतात किंवा जखमी होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाऊस सुरु झाला आहे. याचा परिणाम सुद्धा येथील रस्त्यावरील वाहतुकीवर होऊ शकतो.

अर्धा रस्ता सिमेंटचा तर अर्धा रस्ता कच्चा

त्यामुळे केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि कोणाचा अपघात होण्याआधी किंवा कोणाचा जीव जाण्याआधी अपूर्ण राहिलेला रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page