डोंबिवली

डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर बलात्कार…

डोंबिवली – डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिमखाना रोड, सागर्ली परिसरात हा प्रकार घडला असून, मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी मुस्तफा अली या व्यक्तीविरोधात पॉक्सोअंतर्गत (POSCO) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची आहे.

सदर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा अली सागर्ली परिसरातच राहत असून, माझ्या मुलीला त्याच्या घरी बोलवून शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याचे सदर मुलीच्या आईने तक्रारीत म्हंटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुस्तफा अली विरोधात पॉक्सोअंतर्गत (POSCO) गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page