ठाणे

भाजप आमदार गणपत गायकवाडांना अटक…

उल्हासनगर – शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या वादातूनच उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर या तिघांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page