ठाणे

ठाण्यात ८० लाखांचा चरस जप्त…

ठाणे – ठाण्यात ८ किलो ८२ ग्रॅम वजनाचा, ८० लाखांचा चरस गुन्हे शाखा घटक ५ वागळे पोलिसांनी जप्त केला असून, एकास अटक केली. अभय पागधरे असे याचे नाव आहे.

ठाण्यातील माजिवडा येथे एक इसम चरस या अंमली पदार्थासह मोटार सायकलवरुन येऊन इतर साथीदारांसह पुढे मुंबई येथे हा चरस विकी करण्यासाठी येणार आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणहून अभय पागधरे यास अटक करून एकूण ८०,८२,०००/- रुपये किंमतीचा ८ किलो ८२ ग्रॅम वजनाचा चरस आणि ६१,३४०/- रुपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम इतर मुद्देमाल असा एकूण ८१,४३,३४०/- रुपये चा मुददेमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याविरूध्द कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे निलेश सोनावणे गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहा पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, भुषण शिंदे, पो.उप. निरी सुनिल अहिरे, पोहवा अजय साबळे, पोहवा सुशांत पालांडे, पोहवा माधव वाघचौरे, पोना उत्तम शेळके, पोशि यश यादव यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page