नवी दिल्ली

सुप्रिया सुळे, शशी थरूर यांच्यासह ४९ खासदार निलंबित…

नवी दिल्ली – लोकसभेतून आज पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेतील सुरक्षायंत्रणा भेदण्याच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन करावे, या मागणीसाठी आज पुन्हा लोकसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लोकसभेत पुन्हा एकदा खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावश आहे. तसेच शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम यांच्यासह एकूण ४९ खासदारांना हिवाळी अधिवेशन काळापुरते निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आता दोन्ही सभागृहातून आतापर्यंत १४१ खासदारांचं निलंबन झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page