मुंबई

दरोडा घालणारी टोळी गजाआड…

मुंबई – दरोडा घालणाऱ्या ६ जणांच्या टोळीला टिळकनगर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एकूण ६ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. १) अर्शद नरूलेन खान २) अरफात मोहम्मद मोर्तुझा खान ३) अकबर मोहमद कासीम शेख ४) नईम अलाउद्दीन शेख ५) इम्तीयाझ अब्दुल मजीद खान ६) रविंद्र सुदाम खंडागळे अशी या सहा जणांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी त्यांच्या मित्रांसह त्यांच्या संस्थेकरीता जमीन खरेदी संदर्भात राजावाडी, घाटकोपर (पूर्व) येथून पायी चालत जात असताना सदर अटक इसम आणि पाहिजे इसम यांनी कट रचून दरोडा घालून फिर्यादी यांच्याकडे असलेली २५ लाख रूपयांची रोख रोकड असलेली बॅग मारहाण करून लुटून नेल्याने त्यांनी दिलेल्या तकारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अर्शद नरूलेन खान यास ताब्यात घेतले त्यानंतर त्याचेकडे केलेल्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी अरफात मोहम्मद मोर्तुझा खान, अकबर मोहमद कासीम शेख, नईम अलाउद्दीन शेख, इम्तीयाझ अब्दुल मजीद खान, रविंद्र सुदाम खंडागळे या पाच जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील दरोडा घालून लुटलेली रोख रक्कम ५ लाख २३ हजार रूपये तसेच गुन्हयात वापरलेली रिक्षा व २ दुचाकी अंदाजे किंमत १ लाख ५२ हजार रूपये असा एकूण ६ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page