मुंबई

जबरी चोरी करणारे दोघे गजाआड…

मुंबई – ७ वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत आंतरराज्यीय पातळीवर जबरी चोरी करणाऱ्या दोन दरोडेखोरांना गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी अटक केली.  गणेश पांडुरंग भोसले उर्फ महाराज उर्फ पप्पू  आणि संजू सुनका डोकरे उर्फ अमित उर्फ ददु उर्फ सुका अशी या  दोघांची नावे आहेत.

महाराष्ट्रसह भारतातील विविध राज्यांमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून तसेच शस्त्रांचा धाक दाखवून मोठ मोठया जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या काही दरोडेखोरांबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालाड पूर्व परिसरात सापळा रचून या दोघांना अटक केली.

दरम्यान, हे दोन दरोडेखोर बदनापुर, जि. जालना या पोलीस ठाण्यातील गु.र. क. १२४ / १६ कलम ३९५, ३९७, १२०(ब) भादवि सह ४ २५ हत्यार कायदा या गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात तसेच आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश व इतरही राज्यांमध्ये जबरी चोरीचे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. सध्या या दोघांचा कायदेशीर ताबा स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना देण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page