kalyan

देशी बनावटीच्या पिस्टलसह एकास अटक…

kalyan – देशी बनावटीच्या पिस्टलसह २ जिवंत काडतुस व १ काडतुसाची पुंगळी विनापरवाना बेकायदेशिररित्या कब्जात बाळगणाऱ्या गुन्हेगारास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. बिंदास म्हात्रे याचे नाव आहे.

कोळशेवाडी पोलीस ठाणे हददीत राहणाऱ्या एका इसमाकडे विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व काडतुसे असून, त्याने त्याच्या राहत्या घरात हा मुद्देमाल लपवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी नेतीवली, चक्कीनाका कल्याण पूर्व परिसरात सापळा रचून बिंदास म्हात्रेला अटक केली. तसेच त्याच्या राहत्या घरातून १ देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह, २ जिवंत काडतुस व १ काडतुसाची पुंगळी असा एकूण ६२,०००/-रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा पुढील तपास कल्याण गुन्हे शाखेचे सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले हे करीत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोउपनिरी किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, पोहवा/विजय जिरे, पोहवा/विलास कडु, पोना/दिषक महाजन, पोशि/विजेंद्र नवसारे, मपोहवा जोत्स्ना कुंभारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page