महाराष्ट्र
पोलीस उप निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले…

बीड – एका पोलीस निरीक्षकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी रंगेहात पकडले. प्रकाश दशरथ शेळके असे या पोलीस उप निरीक्षकाचे नाव असून ते सिरसाळा पोलीस ठाणे ता.परळी जि.बीड याठिकाणी कार्यरत होते.
तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांच्या भावाला अटकपूर्व जामीनसाठी मदत केल्याचा मोबदला व गुन्हात मदत म्हणून तक्रारदार यांच्याकडे २५,०००/- रु. लाचेची मागणी करून त्यापैकी १०,०००/- रुपये लाचेची रक्कम शेळके यांनी स्वीकारली असता त्यांना एसीबीने रक्कमेसह रंगेहाथ पकडले.