बेस्ट बस खड्ड्यात अडकली…

mumbai – बेस्टची एक बस रस्ता खचल्याने ५ फूट खोल खड्ड्यात अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना गिरगाव परिसरात सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरद्वार सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळून जात असताना हि बस अचानक रस्ता खचल्याने ५ फूट खोल खड्ड्यात अडकली. गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नलजवळ मुंबई मेट्रोचे खोदकाम सुरू आहे. त्याच भागात रस्त्याच्या समांतर बाजूने बेस्टची बस प्रवाशांसह जात होती. मात्र, अचानक बसच्या मागच्या चाकाखालील रस्ता खचला आणि बस ५ फूट खोल खड्ड्यात अडकली.
दरम्यान, घटनेच्या वेळी बसमध्ये काही प्रवासी होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच खड्ड्यात अडकलेल्या बसला देखील बाहेर काढ्यात यश आले आहे.