ठाणे

देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेले दोघे जेरबंद…

ठाणे – देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी उत्तर प्रदेशहुन आलेल्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. मोहमंद हाशीम इस्त्राईल खान आणि मोहमद रजा मोहमद वजी खान अशी या दोघांची नावे आहेत.

कौसा पेट्रोल पंप या ठिकाणी दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल, २ मॅग्जिन, १ जिवंत काडतूस, १ बुलेट मोटारसायकल असा एकूण १,४६,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page