मुंबई

मंत्रालयासमोर झाडावर चढून तरुणाचं आंदोलन…

mumbai – मंत्रालयासमोर एका तरुणाने झाडावर चढून आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी मंत्रालयासमोर असलेल्या एका झाडावर हा तरुण चढला होता. या तरुणाने एक बॅनर झळकवून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमित सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे.

या तरुणाने जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यामुळे मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी झाडाकडे धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना मंत्रालयाच्या बाहेर पाचारण करण्यात आलं. त्यांनी खाली जाळी धरली. दरम्यान पोलिसांकडून त्याला सातत्यानं खाली येण्याची विनंती करण्यात येत होती. अखेर काही वेळाने तो खाली उतरला.

दरम्यान, या तरुणाच्या गावातील ग्रामपंचायतीत झालेल्या घोटाळ्याबद्दल कारवाई करावी, अशा आशयाचे बॅनर या तरुणाने फडकावले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page