महाराष्ट्र
शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले…
nagpur – शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरजवळील कळमना स्थानकाजवळ या एक्स्प्रेसची एस-२ कोच आणि पार्सल व्हॅनची एकूण आठ चाके रुळावरून घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.