मुंबई
वरळी हिट अँड रन प्रकरणी बारवर कारवाई…
मुंबई – वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहने ज्या बारमध्ये मद्यप्राशन केले होते. त्या बारवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. जुहूतील ग्लोबल तापस बारच्या अतिरिक्त अवैध बांधकामावर पालिकेने हातोडा चालवला आहे.
मिहीर शाहने अपघातापूर्वी तापस या बारमध्ये दारू पिल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बार सील केला. आणि त्यानंतर महापालिकेने बारच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवला आहे.