मुंबई
आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी सुरु…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती एग्रो प्रकरणी ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.
ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी शरद पवार यांनी रोहित पवारांना राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ हे पुस्तक भेट दिलं. तर सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना संविधानाची प्रत दिली.
दरम्यान, काळ असला संघर्षाचा तरी प्रेम, आशीर्वाद, प्रेरणा देणारी इतकी सारी दौलत सोबत आहे… #लडेंगे! #जितेंगे!
असे ट्विट करत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.