मुंबई

पनवेल महापालिकेचा वार्ड अधिकारी एसीबीच्या जाळयात…

नवी मुंबई –  पनवेल महापालिकेच्या एका वार्ड अधिकाऱ्याला ५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबई यांनी रंगेहात पकडले. विश्राम अभिमन्यू म्हात्रे असे या वार्ड अधिकाऱ्याचे नाव असून, ते नावडे उपविभाग पनवेल महानगरपालिका येथे कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीचे मौजे तोंडरे तालुका पनवेल येथील गाळ्याच्या मालमत्ता कर पावतीवर तक्रारदार यांच्या नावाची नोंद घेण्याकरिता म्हात्रे यांनी स्वतः करीता आणि खारघर वॅार्ड अधिकारी यांच्याकरिता online प्रणाली द्वारे तक्रारदार यांचा अर्ज पुढे पाठवण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे रुपये ५०००/- ची मागणी  केली होती. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून रुपये ५,०००/- लाचेची रक्कम स्वीकारताना म्हात्रे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page