मुंबई
४ कोटींचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त…

मुंबई – अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता मुंबई पोलीसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, डी.एन.नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनजण मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर परिसरातील महानगरपालिका उर्दु स्कुल, शाळा क्र.१०२ समोर सापळा रचून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एकूण २ किलो ३३ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केला. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ४ कोटी ६ लाख ६० हजार रूपये इतकी आहे.