पोलिसावर हल्ला करणारा अटकेत…

मीरारोड – पोलिसावर हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात मिरारोड पोलिसांना यश आले आहे. हैफुलअली शेख असे याचे नाव आहे. तर जयकुमार राठोड असे हल्ला करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, मध्यवर्ती गुन्हे शाखेने मोबाईल चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला आणले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास बंदोबस्तावरील एक पोलीस कर्मचारी जेवण आणण्यासाठी गेले असता पोलीस हवालदार जयकुमार राठोड कार्यालयात एकटेच होते. त्यावेळी सदर आरोपीने बेडीतून हात बाहेर काढत लोखंडी रॉडने जयकुमार राठोड यांच्या डोक्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या खिशातील मोबाईल आणि पैसे चोरून तेथून पळून गेला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून हैफुलअली शेखला सीएसएमटी येथून अटक केली.