मुंबई

mumbai : पोलिसाकडून मुलांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी…

mumbai – मुंबईत आंदोलन करणाऱ्या मुलांना खिशात ५० ग्रॅम ड्रग्जची पावडर टाकून खोट्या केसमध्ये अडकवेन आणि आयुष्य उद्ध्वस्त करेन अशी धमकी एका पोलिसाने दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर मुलाने या धमकीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो व्हायरल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नीट (NEET) पेपरफुटी मुद्द्यावरून मुंबईत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन केले जात होते. त्यावेळी आंदोलनस्थळावरून काही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले होते. व्हॅन चालवणारा पोलीस कर्मचारी पवन सांगळे याने मुलाला बजावले की, पुन्हा या भागात आंदोलनासाठी दिसलात, तर खिशात ५० ग्रॅम पावडर (अंमली पदार्थ) टाकेन. तुम्हाला जामीनही मिळणार नाही आणि पूर्ण आयुष्य तुरुंगात सडेल.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत पवन सांगळेला पदावरून हटवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page