मुंबई
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात…

mumbai – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भातान बोगद्याजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ७ ते ८ वाहने एकमेकांना जोरदार धडकली. यात ५ ते ६ पोलिसांच्या पिंजरा गाड्या, १ महामंडळाची बस, १ टेम्पो, १ पोलीस स्कॉर्पिओ आणि जीपचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात १० ते १२ पोलीस जखमी झाले आहेत तर काही बांग्लादेशी कैदी देखील जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.